केवळ तो शांत होता ..... नेहमीसारखाच ! आपण रौद्र आहोत याची त्याला जाणीव होती. रत्नाकर, सिंधू . पायोधी . आपली अनंत नावे ; अथांग .अपरंपार, असीम ,अजस्र , अशी अनंत विशेषणे सार्थ असल्याचा त्याला अभिमान नव्हे माज होता ! तरीही तो शांतच असे कारण संपूर्ण सृष्टीच त्यासमोर नतमस्तक होत असे . एकीकडे धरणीच्या तुकड्याला चहुबाजूने विळखा घालून दुसरीकडे आकाशाला मुक्तहस्ते आलिंगिन द्यावे इतका त्याचा विस्तार...... आणि तळ भेदू पाहण्याऱ्या सूर्यकिरणांना ला...