Being nerd- so uncool, but actually not!!!
"nerd' ह्या शब्दाची gravity मला आत्ता कुठे कळू लागली आहे ! 11th-12th च्या काळात 'projectile motion ' जशी tangent मारून गेली तितकीच ही nerd ची concept सुद्धा अशीच डोक्यावरून गेली ... म्हणूनच ठरवलं की nerds आणि uncool ह्यातलं नेमकं relation समजून घ्यायला हवं .

पार्शवभूमी सांगायची झाल्यास ,मला माझ्या मित्रानी धडपणे तोंडावर mssg पाठवला -'' you are a nerd; believe it or not!'' तेव्हा कुठे ह्या सालस शब्दाशी तोंडओळख झाली. मग child-like curiosity म्हणता येईल इतक्या निरागसपणे मीही विचारला '' nerd म्हणजे नेमकं काय ?''
माझ्या अज्ञानाची यथायोग्य टर उडवून झाल्यावर महाशयांनी' nerd' चा dictionary meaning 'screenshot ' द्वारे पाठवलं (screenshot ही मानव जातीला मिळालेली दैवी देणगी आहे या विधानाशी कोणीही असहमत नसावं ,I guess..)तर , anyway, nerd चा खरा अर्थ काहीसा असा आहे : ''one who has an intense,obsessive ,interest in something' पण ;कोणा विद्वान माणसानी 'शब्दाचे अनेक अर्थ'ला 'अर्थाचा अनर्थ' असा सोयीस्कर फाटा देऊन नवा अर्थ रूढ केला जो दुर्दैवानी खऱ्या अर्थाहूनही जास्त प्रचलित आहे ! तर ह्या विद्वानाच्या दृष्टीनं 'nerd' म्हणजे ''unattractive ,socially awkward ,annoying ,undesirable and or boring person''
Guys, ही definition दुर्दैवानी' introvert' ला ही लागू केली जाते जी निश्चितपणे चुकीची आहेच ;पण ज्यांना आपण ' nerd' असं casually म्हणून जातो त्यांच्यासाठी बोचारीही आहे!!!!!
Nerd is anyone having OCTs(obsessive compulsive traits) .. ह्या न्यायनी आपण सगळेच nerds आहोत!!Nerd= 24*7 अभ्यास करणारं ढापणं पोर जे खांदे पडून चालतं कारण पाठीवरच्या दप्तरात हे 'विश्वचि माझे घर';लाही लाजवेल इतकं ओझं असतं अशीच आपली समजुत आहे ना ? तर काढा आता ही डोळ्या समोर ची झापडं!
उदाहरण द्यायचं झाल्यास , आपल्यातल्या कित्येकांच्या डोक्यावर clash of clans चा भूत सावर होतं , मग ते झाले COC-nerds. तसेच कित्येक जण सध्या आहेत GOT-nerds!!!! असेच painting-nerds, Techno-nerds , जितक्या म्हणून ६४ कला अस्तित्वात आहेत त्या प्रत्येक कलेत ,प्रत्येक विद्येत nerds आहेत !
Being nerd is essential actually! Cauz it gets the work done! Let's not get confused between nerds and weirds though being weird has its own beauty.... We all are nerds because we all have hobbies, we have something to cherish , something to dwell upon! मग उगाच दुसऱ्याच्या नावे बिलं फाडण्यापेक्षा 'आपण सगळे एकाच माळेचे मणी आहोत ' ही fact accept करणं फारच सुटसुटीत ,सोप्पं ,सरळआणि साधं नाही का ?
आता ह्यातली गमतीची बाब अशी की जेव्हा आपल्याला कोणी nerd असं म्हणतं तेव्हा लगेचच आपण denial =1st stage of grief मध्ये जातो ,जणु काही फारच लाजिरवाणा प्रकार घडला असावा !
Friendz, nerd असणं cool आहे कारण तुम्ही तुमच्या हक्काच्या क्षेत्रात nerd आहात. मग साल्यांनो ,अभिमानानं कबुल करा ना की ''yes, I'm a nerd''
तो प्रत्येक माणूस जो आपल्या आवडीला पूर्ण न्याय देतोय ,जगाचा विसर पडेल इतका आपल्या छंदाशी एकरूप होतोय अन त्यातल्या फकिरी इश्कासाठी बरबाद होतोय ,तो प्रत्येक जण nerd, geek, अगदी निश्चितपणे आहे ! म्हणूनच मला वाटतं कि nerd ह्या गोजिरवाण्या शब्दाला मराठीतला parallel शब्द 'विचित्र ' किंवा 'तिरसट ' नसावा तर 'नादवेडा ' असा असावा !!!! guys, पटतंय का तुम्हाला ????

असो , करा करा , यावरही विचार करा ..... आणि एखाद्याची ' nerd' म्हणून टिंगल- टवाळी कारण्यापूर्वीही विचार करा ... ....
अशीच भेटेन पुढच्या post मधून , till then,
bye bye, अल्विदा , de au revoir.......
- Shruti Umesh Joshi
Awesome!!
ReplyDeleteExcellent
ReplyDeleteCool
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteVery nice
ReplyDelete