Skip to main content

मी अन् माझे दैव!

मी अन माझे दैव !

(बलात्काराला बळी पडलेल्या दुर्गेस समर्पित )

क्षण  माझा आला होता ,
             दैवाने तो दूर  लोटला ;
मग भग्न कधी जाहले 
             माझेच मजला कळले नाही !

या चोरट्या हास्यामागे 
              कैक अश्रू लपवू पहिले  
पण ;कोरड्या आसवांचे
            दुःख   तुजला दिसलेच नाही !

 करून यज्ञ "'त्या''  दिनी 
          माझ्याच निष्फळ प्रयत्नांचा
दिली आहुती प्राणपणाने 
          जी तुजला पोहोचलीच नाही !

रंग चोरले माझे 
          याच क्रूर दैवाने 
अन बेरंगात त्याच्या 
          आकंठ रंगले मी !

सावलीने माझ्या 
            घात माझाच केला !
पण रिचवून प्याले तिच्याच नावी 
             काळोखी गुरफटले मी !

काय  गुन्हा  माझा होता ?,
             मला कधी न कळणे  आहे 
पण लाख गुन्हे पुन्हा करण्या ,
             परत उभी ठाकले  मी !

क्षणैकात झाली 
            भस्मसात स्वप्ने 
लिंपून ती विभूती 
             मुक्त जाहले मी!

मग माझ्याच आसवांची 
            नशा मलाच चढली ,
फकीरमस्तीत  माझ्या 
            उध्वस्त जाहले मी!

कैफाच्या या बाजारी  
            आज सुख मी विकू पाहते 
भाव योग्य मिळता त्याचा ,
             मार्गस्थ जाहले मी !. मार्गस्थ जाहले मी ! ......................
                                             - श्रुती जोशी

Comments

Popular posts from this blog

स्वार्थ - परमार्थ

  स्वार्थ - परमार्थ सध्या जे नाणं बंगालमधून दिल्लीकडे उडवलं जातंय त्याला 2बाजू आहेत. जे दोन प्रश्न आधीपासूनच चव्हाट्यावर होते तेच या नाण्याच्या दोन बाजू म्हणून एकत्र आलेले आहेत- safety of women in workplaces आणि violence against healthcare workers. आपण इतके बोथट झालोय का की जोपर्यंत बलात्कार निर्घृण नसेल तोपर्यंत आपला attitude हा ' ये तो होताही रहता है, इसमे क्या नई बात हुई?!' असा असतो. इतक्या श्र्वापदी (जनावर सुद्धा अशा क्रूरतेने दुसऱ्या जनावराला मारत नसेल) प्रकारे एका on duty बाई चा सामूहिक बलात्कार आणि हत्या होत असेल तर हे society as a whole म्हणजे संपूर्ण समाजाचं अपयश आहे. तेव्हा हा मुद्दा केवळ doctors पुरता मर्यादित नसून तो We all vs The Sytem असा आहे. समूहाने राहणे याचा मुळातच उद्देश सामाजिक सुरक्षा होता, त्यामूळे आपल्याला पटो किंवा ना पटो, आवडो किंवा ना आवडो आपण समाजाचं देणं लागतो अन्यथा आज जर हिच्यासोबत झालं तर उद्या दुसरी, परवा तिसरी हे होतच राहील... जोपर्यंत प्रॉब्लेम माझ्या घरापर्यंत पोहोचत नाही तोवर मला काय करायचंय असा समज आपला असेल किंवा लढणारे लढुदेत ; आपण बरं अ...
                                                                        क्यों  यारा कुछ बातें तुम्हें बैठकर बतानी थी , एक cup coffee तेरेसंग बाँटनी थी |  पूँछना था तुझे , क्या याद भी हूँ मैं ? अरे वही तो हूँ ,जो तुझे देखके पगलोंकीतरह मुस्क़ुराती थीं ,                         बस  बेवज़ह हँसके निकल जाती थीं |  हाँ , मुझे तो तुम पूरे के  पूरे याद हो , वही लम्बी उँगलियाँ , वही अदाएं , तूम्हारे घुँगराले  बाल , वही  लेबाज़  वही ग़ुरूर , वही चाल , जैसे नई बोतल पुरानी शराब  शराब से याद आया ज़नाब , हमपे आपका नशा सा था ! हिम्मत तो हममें तबभी थी , पर वक़्त थोड़ा ख़राब सा था  वैसे महोब्बत तो की आपने भी थी , शायद बोलने में कच्चे थे |  पता हैं मुझे , table पर पड़े ठन्डे चाय के मेरे c...

Being nerd-so uncool,but actually not!!!

Being nerd- so uncool, but actually not!!!   "nerd' ह्या शब्दाची gravity मला आत्ता कुठे कळू लागली आहे ! 11th-12th च्या काळात 'projectile motion ' जशी tangent मारून गेली तितकीच ही nerd ची concept सुद्धा अशीच डोक्यावरून गेली ... म्हणूनच ठरवलं की nerds आणि uncool ह्यातलं नेमकं relation समजून घ्यायला हवं .  पार्शवभूमी सांगायची झाल्यास ,मला माझ्या मित्रानी धडपणे तोंडावर mssg पाठवला -'' you are a nerd; believe it or not!'' तेव्हा कुठे ह्या सालस शब्दाशी तोंडओळख झाली. मग child-like curiosity म्हणता येईल इतक्या निरागसपणे मीही विचारला '' nerd म्हणजे नेमकं काय ?''  माझ्या अज्ञानाची यथायोग्य टर उडवून झाल्यावर महाशयांनी' nerd' चा dictionary meaning 'screenshot ' द्वारे पाठवलं (screenshot ही मानव जातीला मिळालेली दैवी देणगी आहे या विधानाशी कोणीही असहमत नसावं ,I guess..)तर , anyway, nerd चा खरा अर्थ काहीसा असा आहे : ''one who has an intense,obsessive ,interest in something' पण ;कोणा विद्वान माणसानी 'शब्दाचे...