क्योंकि कुछ changes अच्छे होते हैं !
गुलज़ार .....या नावातच जादू आहे !अन लोकसत्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या निमित्तानी या जादुई व्यक्तिमत्वाला 'याचि देही ' पाहण्याचा अविस्मरणीय योग आला ! नाही, नाही . . . . . हा blog गुलज़ार यांच्यावर नाहीये (गुलज़ार बद्दल इतक्या लोकांनी इतकं काही मनापासून भरभरून लिहिलंय की बस्स . . . . उसपे भी बन्दे का दिल आ जाए ! आणि माझी तितकी योग्यताही नाही . . . असो .
. . )त्यांच्याशी झालेल्या गप्पांमधून अनेक गोष्टी ,अनेक महत्वाचे मुद्दे समोर आले माझे पुढचे काही ब्लॉग्स याच मुद्द्यांना धरून , त्यावरच based असतील . . . . . .पहिला मुद्दा जो मला तुम्हा वाचकांसमोर अगदी प्रकर्षाने मांडला जावा असं वाटतं तो म्हणजे " भाषेचा " !
"आपल्या " भाषेत नवसाहित्य निर्मिती आजच्या generation नी करावी ही प्रत्येक लेखकाची सुप्त इच्छा आहे अन गुलज़ार साहेबही याला अपवाद नाहीत पण खंत याची आहे की आपल्या भाषेत आपली साहित्य निर्मिती खुंटत चालली आहे कदाचित . गुलज़ार साहेबांना एक प्रश्न विचारला गेला "आपको नहीं लगता क़ि अंग्रेजी के इन्फ्लुएन्स क़ि वज़ह से regional languages जैसे मराठी ,तामील इतना ही नहीं बल्कि उर्दू तक का महत्व कम होते जा रहा है ? " यावर महाशयांनी खडा सवाल केला "आपको लगता है के मराठी regional language हैं ?ज़नाब ,मराठी २३०० साल पुरानी जुबाँ हैं !हिंदी तक इतनी पुरानी नहीं। मैं तो कहता हूँ के ये सबहीं भाषाएँ राष्ट्रिय भाषा हैं ! " मला वाटतं की या पहिल्या वाक्यातच rather प्रश्नातच मला जे काही म्हणायचं आहे त्याचा exact आशय आलाय . कोणत्याही भाषेचा विस्तार ,आवाका त्या भाषेतल्या ना कादंबऱ्यांवर ना फक्त कवितांवर dependent आहे तर तो खऱ्या अर्थाने त्या भाषेतल्या बालसाहित्यावर अवलंबून आहे . आणि मला अभिमान वाटतो की केवळ मराठी ,बंगाली आणि मल्याळम या भाषांना बालसाहित्याचा समृध्द वारसा लाभलाय !!!पण काळाच्या ओघात या [ आता 'regional' असं नाही म्हणणार ; region limited ] languages मागे पडत आहेत . . . . . स्वाभाविकच आहे ते ; ज्ञानभाषा english आहे . Let me be very clear की माझा ना english ला विरोध आहे ,ना हिंदीला ; माझा विरोध आहे तो कोणत्याही दोन भाषांना compare करून त्यातल्या अमुकतमुक भाषेला बहाल केल्या जाणाऱ्या श्रेष्ठत्वाला !!
आता वर मांडलेल्या ' problem' वरचं solution ही साहेबांनी सांगितलं "आप रोज़मर्रा क़ि जिंदगी में इस्तेमाल करें आपके मराठी या बंगाली या तमिलतेलगू जो कोई भाषा हो उसका। बच्चों के साथ घर में मातृभाषा में बात की जिए। आसान तो हैं ; बस 'हमें' यह करना पड़ेगा ! " खरंच की !! सोप्पं तर आहे solution नहीं ! पण त्या पुढची मजा अशी की आपल्याला 'कळतं पण वळत नाही '!! mall मधे गेल्यावर ,कोणत्या posh boutique मधे गेल्यावर नकळत पणे तोंडून " could you please tell me the price of so &so .... " असंच येतं जरी समोरच्या माणसाला मराठी \हिंदी येत असेल ; जरी आपल्या शेजारी आपलं so called sophisticated conversation ऐकणारं 'grammer nazi ' प्रकरण नसेल तरीही आपण english मधून बोलणंच prefer करतो कारण मनाच्या कोणत्याशा कोपऱ्यातून आपण स्वतःलाच judge करतो कदाचित -as if english मधून संवाद साधणं हे moral obligation किंवा status symbol आहे !
आता असा प्रसंग ज्याच्याशी I guess almost प्रत्येक जण स्वतःला correlate करू शकेल- hotels !!!!! " Excuse me, पाणी द्याल का हो?" असं चुकूनही एखाद्या दुर्दैवी जीवाने विचारलंच तर आसपासच्या तमाम उच्चभ्रू लोकांच्या नजरा ( अगदी typical पद्धतीने केसाच्या टोकापासून ते बोटाच्या नखापर्यंत वरून खाली खालून वर न्याहाळत ) त्या जीवाला 'judge' करून , त्याच्यावर लेबलं लावून मोकळ्या झालेल्या असतात !!!! अन मग आपल्याला या प्रकारच्या गोष्टींमुळेच स्वभाषेची लाज वाटायला लागते ! no doubt की आपलं english चांगलं असायलाच हवं पण म्हणून इतर बोली भाषा inferior आहेत असं नाही ....
थोडंसं संस्कृत बद्दल बोलेन ...... संस्कृत चं महत्त्व १०-१२ वी १०० मार्कांच्या papers पुरतं आणि 'scoring language ' पुरतं मर्यादित असलेलं पाहून दुःख होतं ....... I won't deny की संस्कृत मृतभाषा होण्याच्या उंबरठ्यावर आहे आणि काही संस्कृत प्रेमी लोकांनी सुरु ठेवलेल्या प्रयत्नांमुळे ती कशीबशी at least एक language as one of the subjects च्या ventilator वर तग धरून आहे आपल्या generation मधे तर अशा लोकांची संख्या नगण्य असेल याची मला खात्री वाटते ! असो ; काळाच्या ओघात संस्कृत चं महत्व कमी होण्याचं कारण असं की दैनंदिन वापर अन काळानुरूप बदल शून्य . पण जर मातृभाषाही मरणपंथाला लागण्याची चिन्हं दिसत असतील तर ती भाषा मरु नं देणं हे आपलं कर्तव्य आहे आणि याची जाणीवही माझ्या -आपल्या generation च्या बहुतांश लोकांना नसणं हे दुर्दैवी सत्य !!!
थोडंसं विषयांतर करतीये - माझा पहिला blog - being nerd लिहिला तो minglish [मराठी + english ] मध्ये ! तेव्हा वाटलं की आपण अस्खलित ,संपूर्ण शुद्ध मराठीत लिहू शकत असतानाही हे mix & match लिहिणं म्हणजे मराठीशी केलेली गुस्ताख़ी तर नाही ??!! पण लोकांचा प्रतिसाद अपेक्षेच्या उलटा होता अगदी ! त्यांना हे असलं mixed language मधलं 'काहीतरी ' आवडलं ....... for a few people ,it was easy to relate with कारण day -to -day life मध्ये आपणही अगदी 'लोभ वृद्धिंगत व्हावा ही विनंती ' types वाक्य बोलत नाही !!! माझं हे अर्थातंच personal मत आहे की आपल्याला आपापल्या भाषांना जपायचं असेल तर थोडं लवचिक रहावंच लागेल ; त्यात गैर काहीच नाही ! "मत्प्रिय सवंगड्यांनो " च्या ऐवजी 'dearest friends ' accept केल्यानी बिघडत काहीच नाही .
"अग़र आपके रस्मोरिवाज , पेहराव तक वक़्त के साथ बदल गए हैं तो language कैसे नहीं बदलेगी ? अगर उसका class पहले जैसा classic ऱखने जाओ तो वह बस classic class तक ही limited रहे जाएगी ! फ़िर fridge में preserve करकें रखना पड़ेगा !!!! "- गुलज़ार साहेब
आता हिंदीचंच म्हणाल तर , " आप ,हमें ,आपको " ची जागा "तेक्को , मेक्को, मैं जारी (ह्याचं original version 'मैं जा रही हू ' असं आहे बरंका !!! ) " ने घेतलीये ..... ह्यातला बरोबर- चूक असा तात्विक मुद्दा सोडला तर हे लक्षात घ्यायला हवं की कितीही बदलली तरी हिंदी अजूनही प्रचलित आहे आणि असेलही! याचं करण म्हणजे काळानुसार झालेल्या बदलांचा acceptance .
बदलांचंच म्हणाल तर कधीकाळी 'अहो कसे आहेत ' वगैरे गोष्टी पत्र पाठवून आबांना विचारणारी माझी आजी हल्ली मला whatsapp वर 'nice dp ' असं कधीतरी पाठवते ..... वर emoljies च्या पलीकडे तिचं ज्ञान गुलाब ,पुष्पगुच्छ आणि फटाके पाठ्वण्यापर्यंत विस्तारलंय आणि senior citizens च्या या अश्या whatsapp -ज्ञानाच्या कक्षा दिवसेंदिवस रुंदावतात चालल्यात ...... केवढा मोठ्ठा बदल आहे हा !!!!!! मग आपणही ' शिर साष्टांग नमस्कार विनंती विशेष ' च्या अट्टाहासावर का आडून बसायचं ? थोडासा बदल, थोडी liberty तो मंगती हैं ना भाईलोक ?! पण म्हणून आपली भाषा या सरमिसळीच्या नादात तोकडी राहावी अस अजिबातच नाही ! शेवटी काहीही म्हणा boss , "शिवाजी महाराजांनी वाघनख्यांनी अफ़झल खानाचा कोथळा बाहेर काढला " चा feel इतर कोणत्याच भाषेत नाही ! तुम्हीपण हे मान्य कराल की "you bloody moron " पेक्षा "अरे कुत्र्या " जास्त लागतं हो मनाला !!! 'तुझ्या मारी तुझ्या ' आणि ह्याचे अन्य versions (सूज्ञ लोकांची tube पेटली असेल ही अपेक्षा) साठी मराठी ला ;नज़ाकत ,आदबशीरपणा साठी उर्दूला आणि F'off साठी (ह्याचा संदर्भ आपापल्या घरच्या आगाऊ कार्टयांना विचारावा ही नम्र विनंती !!)english ला पर्याय नाही! In short , प्रत्येक भाषेचं स्वतःचं वेगळं महत्वं ,वेगळी style आहे जिच्यामुळेच तिचं अस्तित्वं टिकून असतं ! ते टिकवून ठेवायचं असेल तर ही unique style अन्य बदलांसोबत जपली गेलीच पाहिजे ......
'हल्ली काय ,सगळंच बदललंय हो !' मधला बदललंय खाली दडलेला 'बिघडलंय ' चा सूर जेव्हा जाईल तेव्हा तो बदल निश्चित स्वागतार्ह असेल ! After all , Changes are necessary ; in fact change is the only constant but let's not forget that old is gold in the end! changes will occur anyway ; inspite of that we have to preserve our मराठी , our मातृभाषा , our culture which makes us what we are !
So , जे बोलायचंय ,जसं बोलायचंय तसं निर्लज्जपणे बोलतं राहूयात , इतरांना बोलकं करूयात आणि लिहीत राहुयात !अशीच भेटेन पुढच्या blog मधून - एका वेगळ्या विषयासोबत .
till then , bye bye ,अल्विदा , de au revoir .........
- श्रुती जोशी

impressive doctor madam shruti
ReplyDeleteThank you very much sir, pan madam vagare naka mhanu ho!!!😊😊😅
DeleteBorgata Hotel Casino & Spa - MapYRO
ReplyDeleteBorgata 시흥 출장안마 Hotel Casino & Spa is 강원도 출장마사지 the ultimate destination for Atlantic City 대구광역 출장마사지 entertainment, featuring more than 2,300 beautifully designed, 광주 출장안마 2,200 accommodations, 고양 출장안마