Skip to main content

स्वार्थ - परमार्थ

 स्वार्थ - परमार्थ

सध्या जे नाणं बंगालमधून दिल्लीकडे उडवलं जातंय त्याला 2बाजू आहेत. जे दोन प्रश्न आधीपासूनच चव्हाट्यावर होते तेच या नाण्याच्या दोन बाजू म्हणून एकत्र आलेले आहेत- safety of women in workplaces आणि violence against healthcare workers. आपण इतके बोथट झालोय का की जोपर्यंत बलात्कार निर्घृण नसेल तोपर्यंत आपला attitude हा ' ये तो होताही रहता है, इसमे क्या नई बात हुई?!' असा असतो.
इतक्या श्र्वापदी (जनावर सुद्धा अशा क्रूरतेने दुसऱ्या जनावराला मारत नसेल) प्रकारे एका on duty बाई चा सामूहिक बलात्कार आणि हत्या होत असेल तर हे society as a whole म्हणजे संपूर्ण समाजाचं अपयश आहे. तेव्हा हा मुद्दा केवळ doctors पुरता मर्यादित नसून तो We all vs The Sytem असा आहे. समूहाने राहणे याचा मुळातच उद्देश सामाजिक सुरक्षा होता, त्यामूळे आपल्याला पटो किंवा ना पटो, आवडो किंवा ना आवडो आपण समाजाचं देणं लागतो अन्यथा आज जर हिच्यासोबत झालं तर उद्या दुसरी, परवा तिसरी हे होतच राहील... जोपर्यंत प्रॉब्लेम माझ्या घरापर्यंत पोहोचत नाही तोवर मला काय करायचंय असा समज आपला असेल किंवा लढणारे लढुदेत ; आपण बरं अन् आपलं काम बरं असं आपल्याला वाटत असेल तर एक क्षण डोळे बंद करून असा विचार करून पहा की ती मुलगी तुमची असली असती, तुमची बहीण - आई - बायको असली असती तर त्यावेळीही तुम्ही समजाकडून सामाजिक बांधिलकीची अपेक्षा ठेवली नसती काय? जर system मधे बदल हवा असेल तर "असेल माझा हरी तर देईल खटल्यावरी" म्हणत घरबसल्या रातोरात बदल होतील असा विचार करणं बालिश किंवा मूर्खपणाचं लक्षण म्हणायला हवं. मग समाज म्हणून आपण काय काय करु शकतो? यात Acute actions आणि Future plans असं विभाजन करता येईल. Acute actions म्हणजे आत्ता, सध्या काय काय करता येईल - तर social media चा जोरदार वापर. अजूनही mainstream media platforms वरती हे प्रकरण म्हणावं तेवढं ताणून धरलेलं नाही, तेव्हा आधी ह्या प्रकरणाची आणखीन जास्त detailed माहिती घ्या - तुमचे जे ओळखीचे doctor मित्र असतील ज्यांना आपण कधीही बिनदिक्कत रात्री अपरात्री ' अरे जरा काम होतं एक...***च्या पोटात दुखतयं' असं विचारत असतो त्यांना आताही हक्कानी ह्या प्रकरणाबाबत विचारा. आपण कोणत्या restaurant मधे जाऊन काय काय खाल्लं , कोणासोबत trip ला गेलो, ह्या सगळ्या गोष्टीपेक्षा हे post ला टाकणं हे जास्त संयुक्तिक ठरेल. जितक्या जास्त लोकांपर्यंत हे पोहोचवता येईल, जितके सामूहिक प्रयत्न, मोर्चे ह्यात सहभागी होता येईल तितकं आपण निश्चितच करु शकतो...Future plans मधे अगदी self defence पासून Teach your Boys to become better men पर्यंत सगळंच येईल..
आता दुसरा मुद्दा आहे ज्याच्यासाठी आम्ही Doctor लोकं आंदोलन करतोय, दवाखाने बंद ठेऊन निदर्शनं करतोय...ते का? आणि इतकी टोकाची भूमिका आम्ही का घेत आहोत असा गोंडस प्रश्न आपल्यासमोर असेल तर त्याचंही उत्तर सविस्तर देते. इतक्या हिस्र प्रकारे doctor ची हत्या तिच्याच कर्मभूमीमधे, तिच्या दुसऱ्या घरी-hospital मधे इतक्या सहजपणे करता यावी ह्यातच doctors ची security किती कमकुवत असेल (खरंतर ती आहे की नाही इथपासून मुद्दा सुरू होतो) तर hospital मधले, आवाराच्या आतले कोणीही सुरक्षित नाहीत... प्रश्न फक्त इथेच संपत नाही, तर Rape and Murder च्या निषेधार्थ काढल्या गेलेल्या शांतीपूर्ण मोर्चाच्यावर रातोरात हजारो च्या संख्येत गुंड हल्ला काय करतात,hospital मधे जाऊन तोडफोड काय करतात... ह्या गोष्टी इतक्या सहजतेने कशा काय शक्य होऊ शकतात ? याचं कारण आहे ' हमी ' ..doctors वरती,hospital मध्ये कितीही दंगे केले - मारहाण केली तरीही फार काही मोठी शिक्षा नं होता किंवा शिक्षाच न होता आपण सुटू ह्याची हमी आणि कितीही काहीही केलं तरी doctors आपलं काम करतंच राहतील असा taken for granted-doctors ना गृहीत धरण्याचा attitude. तेव्हा आम्ही रस्त्यावर उतरलेले doctors आमच्या living conditions सुधारा, आम्हाला 36-48 तास duty लावू नका, दिवसातून किमान एका वेळी खाणे आणि तासभर झोपणे द्या अशा अपेक्षा बाजूला ठेऊन एक सुरक्षेची हमी द्या, जे doctors वर हल्ला करतील त्यांना कठोर शासन करा जेणेकरून अशी हिम्मत परत नाही होणार,hospital ही गुंडांना मवाली दाखवण्याची जागा नाही हे नमूद होईल केवळ इतकी एक मूलभूत हक्काची मागणी करत आहोत. पोलिस स्टेशन मधे घुसून पोलिसांवर हात उचलणारा किंवा न्यायालयात घुसून, कोणत्याही प्रशासकीय ठिकाणी घुसून गैरवर्तन करणारा इतक्या मुक्तपणे हिंडू शकतो काय ..?.. तर नाही ! मग फक्त हॉस्पिटल्स ह्याला अपवाद का? जे हात, जे घटक आज doctor वरती उठताहेत तेच उद्या आत घुसून रुग्णांवर उठतील...आम्ही अशा घटना सर्रास बघतो, अगदी आमच्याच बाजूला घडताना, कोणीही यावं अन् चाकू भोकसून जावं, कोणत्याही शिक्षे शिवाय मारहाण करून जावी  अन् तरीही तो च समाज आम्हाला "तूम्ही काय, पैसे काढायला बसला आहात... फसवायला बसला आहात" असं ऐकवतो वैद्यकीय पेशा हा नेहमीच स्वार्थ आणि परमार्थाचा नाजूक  तराजू सुवर्णमध्यावर तोलत आलाय.. ह्या अशा घटनांमुळे भावी पिढीचं पारडं स्वार्थाकडे का बरं झुकू नये...?
आता माझ्या तमाम Doctors community साठी काही विनंतीवजा तक्रारी.... आपण वर्षानुवर्ष Toxic workplace culture ला normalize करत आलोय..."माझा बॉस मला सलग 3 दिवस काम करायला लावायचा, आम्हीही केलंच ना..." किंवा "आम्ही तर तशीच बिना gloves ची कामं केलीत, 5-6 दिवस बिना आंघोळीचे राहिलो" अशी तुझा trauma मोठा की माझा; मी पण सहन केलं म्हणून तूही सहन कर अशी "सासुसून" mentality सोडूयात आता.... आधीच्या पिढ्यांनी भोगलं म्हणजे ते बरोबर होतं किंवा म्हणून तुम्हीही भोगू शकता हा विचार बंद व्हायला हवाय. Patients आणि त्यांच्या नातेवाईकांच्या समोर भर वॉर्डात JR 1,2,3 ह्यांना फैलावर घ्यायचं, अश्लाघ्य भाषेत वाभाडे काढायचे ह्यातून patients मधे मुळातच आम्हाला incompetent आणि inefficient doctors च्या हवाली ठेवलं जातंय असा गैरसमज निर्माण होतो. You cannot undermine the authority of frontiers of your own community in public and then expect them to respect the same again.
Last but not the least ; जियेंगे तो और लडेंगे... पर पहले जीना तो होगा...त्यामूळे ही अशी एकजूट, हा असा sense of community, असं momentum परत मिळणे नाही ; परत कधी असं होऊच नये; सर्व सेवा बंद ठेवाव्या लागतील आणि मगच मागण्या मान्य होतील याची संधीच वारंवार येऊ नये याचं साठी आपण "या तो इस पार या उस पार"  आपल्या मूलभूत सुरक्षेकरिता केलंच पाहिजे......

शुभ्र होता तिचा सदरा, पण आज लाल रंगाचा
हिशोब आम्ही ठेवला आहे  थेंब थेंब रक्ताचा |

हे द्रौपदी का शोधिसी वाली कुणी वा कृष्णही?!
घे वस्त्र चिंध्या, चल फास लावू ; तू पार्थ - आम्ही सारथी ||
                                                                            
                                                                                                  Dr.Shruti Joshi
                                                                                                   JR1(MD Dermatology)

Comments

  1. खूप balanced आणि विचार करायला लावणार मुद्देसूद लिखाण. आशा बाळगूया परिस्थितीत सुधारणा होईल आणि नक्कीच चांगले बदल घडतील......
    कारण माणूस शेवटी आशांवर जगत असतो

    ReplyDelete
  2. श्रुती सामाजिक परिस्थितीचा आणि घडलेल्या विकृत मनोवृत्तीचा लांचनास्पद घटनेचा तू यथार्थ शब्द वेध घेतलेला आहेस .
    शासन वेळेत जागृत झाले तर ठीक अन्यथा जनता जनार्दन रस्त्यावरती उतरून गुन्हेगारांचा मुद्दा पाडल्याशिवाय राहत नसते .

    ReplyDelete

Post a Comment